Pune Vande Bharat : नागपूर-पुणे ‘वंदे भारत’चा पीएम मोदींच्या हस्ते शुभारंभ; भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन, 16 तासांचा प्रवास 12 तासांत होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑनलाईनच्या माध्यमातून नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यासोबतच महाराष्ट्राला देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे या वंदे भारत एक्सप्रेसची पाहणी केली. एक्सप्रेसच्या उद्धाटनाला नागरिक देखील मोठ्या संख्येने पोहोचले होते. या गाडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते पुणे हा 16 तासांचा प्रवास आता केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.