Pune Swargate : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री अटक; पोलिसांची शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावात कारवाई
स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.