Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला- मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे नाव न घेत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सवाल केला आहे. तर महसूलमंत्री असताना पुण्यातील 342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला? अशी विचारणा जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत केली आहे.