Pune rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरण : परिवहन मंत्र्यांनी २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले!
पुण्यातील स्वागरगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून काढून टाकण्यात आले. याचबरोबर आजपासून तातडीने नवीन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.