Pune Municipal : 1 जुलैनंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना यंदा मतदानाचा अधिकार नाही; मनपा निवडणुकीत राज्य आयोगाची मतदारयादीच ग्राह्य
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली 1 जुलै 2025 रोजीची मतदारयादीच वापरली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यानंतर मतदार नावनोंदणी केलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार या निवडणुकीत मिळणार नाही. आयोगाच्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत सुमारे 35 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.