Sanjay Raut : अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही; दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावरून संजय राऊतांचा इशारा
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.