Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- भुजबळांची विखेंवर टीका हे मुख्यमंत्र्यांना आव्हान; भुजबळांना अजित पवार अन् फडणवीसांनी नव्हे तर मोदींनी मंत्री केले
छगन भुजबळ यांना काही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वत:ला ओबीसींचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.