Radhakrishna Vikhe Patil : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- आता धरणांच्या पाण्यावर तयार होणार वीज!, राज्यात ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारणार
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांच्या जलाशयांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या धरणांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प (फ्लोटिंग सोलर) उभारून महाराष्ट्राला हरित ऊर्जेत आघाडीवर आणण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.