Pune Fort Murder : पुण्यात सोनम रघुवंशीसारखे प्रकरण:तरुणीने प्रियकरासोबत मिळून भावी पतीला 400 फूट खोल दरीत ढकलले; नोव्हेंबरमध्ये होते लग्न
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडासारखेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.