Supriya Sule : नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही; सुप्रिया सुळेंचे प्रशांत जगपात यांना खडेबोल
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.