• Download App
    Pune court hearing May 2026 | The Focus India

    Pune court hearing May 2026

    Nasrapur Case : नसरापूर अत्याचार-हत्याप्रकरणी 15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात होणार असून, दररोज जलद गतीने हा खटला चालवला जाणार आहे.

    Read more