Pune Commissioner : आयुक्तांच्या घरात २० लाखांची चोरी, नेमकं गौडबंगाल काय?
Pune Commissioner पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातुन लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यात एसी, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, कॉफी मशिन, फुलांच्या कुंड्या यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. एकूण २० ते ३० लाखांचं सामान चोरीला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. मात्र याबाबत कुठलीही तक्रार अजून झालेली नाही.