Fadnavis : समाजाच्या आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे; कबुतरखानाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.