Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.