Manoj Jarange : मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना हमीपत्र; कायदा व सुव्यवस्था राखण्यासह दिली 20 आश्वासने
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.