Professor Khan : सैन्यावर कमेंट करणारा प्राध्यापक खान अटकेत; हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांसमोर हजर झाला नाही
हरियाणातील लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणारे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सोनीपत पोलिसांनी दिल्लीतील ग्रेटर कैलास येथून अटक केली आहे. अशोका विद्यापीठात शिकवणाऱ्या या प्राध्यापकाने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर जठेडी गावच्या सरपंचाने राय पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.