सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर प्रियांका गांधी भडकल्या; खरा – खोटा भारतीय तुम्ही नाही ठरवू शकत, म्हणाल्या; पण आता कोर्टाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात याचिका!!
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनची बाजू उचलून धरून भारतीय सैन्य दलांवर टीका केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचे कान उपटले. सच्चा भारतीय असली वक्तव्ये करणार नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना फटकारले.