Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या खासदारांना मराठी शिकवावे; प्रियंका चतुर्वेदी दोन ओळीही बोलू शकत नाहीत; शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आणि त्यांच्या बोलण्यात पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.