Mamata Banerjee : रेप केसवर ममता म्हणाल्या- मुलींनी रात्री बाहेर फिरू नये; खासगी महाविद्यालयांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुर्गापूरमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराबद्दल दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी रात्री बाहेर जाणे टाळावे आणि विशेषतः निर्जन भागात सतर्क राहावे.