Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आतंकवादासाठी भगवा शब्द वापरू नये, त्याऐवजी सनातनी आतंकवाद म्हणा, असे विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सनातन संस्थेला दहशतवादी संबोधल्याने सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागण्याचीही मागणी केली.