King Charles : ब्रिटिश किंग चार्ल्स यांनी भावाला राजवाड्यातून बाहेर काढले; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, अँड्र्यूकडून राजकुमार पदवीही काढून घेतली
ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी त्यांचा धाकटा भाऊ अँड्र्यू याच्याकडून राजकुमारपद काढून घेतले आहे आणि त्यांना त्यांच्या विंडसर येथील घरातून बाहेर काढले आहे. बकिंगहॅम पॅलेसने गुरुवारी ही घोषणा केली की, जेफ्री एपस्टाईन घोटाळ्याशी संबंधित अँड्र्यूच्या संबंधांमुळे ते राजघराण्याला त्याच्यापासून दूर ठेवू इच्छितात.