Prime Minister Modis : ‘पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो’, मुंबईतील एका व्यक्तीने पोलिसांना केला फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशाप्रकारची माहिती देणारा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. खरंतर, ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला होता. पंतप्रधान मोदी सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने, पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांना फोनबाबत माहिती दिली आणि तपास सुरू केला.