Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; आता 10 सप्टेंबर नंतरच निर्णय लागण्याची शक्यता
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आगामी 20 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देण्याची अपेक्षा होती. मात्र, आता या प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा लांबीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या घटना पीठामध्ये असल्यामुळे शिवसेना चिन्ह बाबतीत असलेल्या प्रकरणाचा निर्णय आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.