Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- राष्ट्रपतींनी न्यायालयाचा सल्ला घेणे चुकीचे नाही; आम्ही निर्णय नाही, तर मत बदलू शकतो
मंगळवारी, सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी अंतिम मुदत देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने म्हटले की, ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम १४३ अंतर्गत न्यायालयाचे मत मागणे चुकीचे नाही.’