President Kalam : माजी राष्ट्रपती कलाम यांचे वैयक्तिक दस्तऐवज जतन केले जाणार
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे वैयक्तिक कागदपत्रे जतन केली जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मूळ पत्रव्यवहार आणि विविध संस्थांमध्ये दिलेल्या व्याख्यानांशी संबंधित वैयक्तिक कागदपत्रे राष्ट्रीय अभिलेखागाराकडे सोपवली आहेत. त्यात अनेक छायाचित्रे देखील आहेत.