DRDO : DRDOची ड्रोनवरून ULPGM-V3 क्षेपणास्त्र चाचणी; ड्युअल-चॅनेल हाय डेफिनेशन सीकरने सुसज्ज
भारत आता पायलटशिवाय हवाई ड्रोन वापरून दूरवरून शत्रूच्या बंकर किंवा टँकना लक्ष्य करू शकतो. कारण डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील राष्ट्रीय ओपन एरिया टेस्टिंग रेंजमध्ये ड्रोन-लाँच केलेल्या प्रिसिजन गाईडेड-व्ही३ ची चाचणी घेतली आहे. ही माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शेअर केली. संरक्षण मंत्र्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ड्रोनमधून केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे दृश्ये आहेत.