MP Chandrashekhar : प्रयागराजमध्ये हिंसाचार : खासदार चंद्रशेखर यांना रोखल्याने उपद्रवींचा धुडगुस; पोलिस अन् लोकांवर दगडफेक
यूपीतील प्रयागराजमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. प्रयागराजच्या रस्त्यांवर २ तासांपासून उपद्रवींच्या जमावाने उघडपणे गोंधळ घातला आहे. जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला, दगडफेक केली आणि डायल ११२ वाहनास उलटवले. बदमाशांनी पोलिस पथकावरही दगडफेक केली. रोडवेज बसेसची तोडफोड करण्यात आली आणि अनेक दुचाकी जाळण्यात आल्या.