Pratibha Chakankar : भोंदू अशोक खरातप्रकरणी प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी; ‘समता’मधील कोट्यवधींचे व्यवहार अन् सह्या बनावट असल्याचा दावा
नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे.