Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला अखेर जामीन; कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिला सशर्त दिलासा
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे.