• Download App
    Pranjal Khewalkar | The Focus India

    Pranjal Khewalkar

    Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये 1779 अश्लील फोटो अन् व्हिडिओ; रूपाली चाकणकरांचा दावा

    पुण्यात काही दिवसांपूर्वी कथित रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे.

    Read more

    Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी; जामिनाचा मार्ग मोकळा

    पुणे येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर सहा जणांना देखील ताब्यात घेतले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून पोलिसांनी खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने प्रांजल खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Read more

    Rohini Khadse : पतीसाठी काळा कोट घालून रोहिणी खडसे कोर्टात, प्रांजल खेवलकरांना महिला आरोपींनी अडकवल्याचा संशय व्यक्त

    रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे मंगळवारी स्वतः काळा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रांजल यांच्यावतीने युक्तिवाद केला नाही. पण त्या पूर्णवेळ कोर्टात हजर होत्या. दरम्यान, प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी ईशा सिंग नामक तरुणीच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

    Read more

    Khadse Son-in-Law : खडसेंच्या जावयाचे पार्टी प्रकरण; ससूनच्या रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न

    रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आहे. खराडी ड्रग्ज पार्टीप्रकरणी ससून रूग्णालयाने आपला अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. त्यात खेवलकर यांच्यासह दोघांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस पुढे काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. दरम्यान, पुणे पोलिसांनी खेवलकर यांचा अहवाल त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांना देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रोहिणी यांनी माध्यमांकडे मदत मागितली आहे.

    Read more

    Pune Rave Party : रेव्ह पार्टीत पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले; प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद, राजकीय षड्यंत्रचा आरोप

    शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टी दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत.

    Read more