CM Fadnavis : ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे; CM फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध
काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.