Prakash Shendge : सुप्रिया सुळे जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? शरद पवारांचाही पाठिंबा आहे का? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा संतप्त सवाल
आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे त्या जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली, यावरून शेंडगे यांनी टीका केली आहे.