Prakash Mahajan : फलटण प्रकरणी प्रकाश महाजनांचा सवाल- चारित्र्यहनन करणाऱ्या रूपाली चाकणकर अजूनही पदावर कशा?
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.