काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊदच्या नादी लागले म्हणून त्यांचे वाटोळे झाले; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकीकडे मुंबईत काँग्रेसशी आघाडी केली असताना दुसरीकडे परभणीत मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार तोंडसुख घेतले. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणूनच त्यांचे वाटोळे झाले, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडले.