Bachchu Kadu : बच्चू कडूंची अजित पवारांवर टीका- दादा तुम्हाला पैशांचे सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा, कृषिमंत्र्यांवरही निशाणा
वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. पैशांचे सोंग जमात नसेल तर खुर्ची सोडा, असे म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बच्चू कडू यांनी अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे.