VVPAT : स्थानिक स्वराज्य निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा मुद्दा न्यायालयात; आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस; 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आता न्यायालयीन निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईव्हीएम यंत्रणेसोबत व्हीव्हीपॅट बसविण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने आयोगाला 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदान प्रक्रियेबाबतचा हा वाद तापण्याची शक्यता आहे.