Prafull Tangadi : भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षाचा भिवंडीत खून, बाळ्या मामांवर गंभीर आरोप
भिवंडीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह त्याच्या एका सहकार्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहेत. प्रफुल्ल तांगडी हा भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होता.