Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राचा नवा विक्रम; १०० दिवसांचे लक्ष्य केवळ ४५ दिवसांत पूर्ण; २० लाख घरांच्या मंजुरीचे पत्र वितरण!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २ महिन्यांपूर्वी ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत २० लाख घरांच्या मंजुरीचे पत्र वितरण आणि १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे वितरण यासाठी १०० दिवसांचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र हे लक्ष्य महाराष्ट्राने केवळ ४५ दिवसांत पूर्ण केले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने हा नवा विक्रम केला.