Power Employees : वीज कर्मचाऱ्यांचा 9 जुलैला राज्यव्यापी संप; अदानी-टोरंट पॉवरला 24 विभागांचे वीज वितरण देण्याच्या निर्णयास विरोध
समांतर वीज परवाना धोरणाच्या विरोधात वीज कामगार संघटनांचा ९ जुलै रोजी राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, (आयटक), सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉग्रेस (इंटक), तांत्रीक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, वीज कामगार संघटनांनी ९ जुलै रोजी संपाची हाक दिली आहे.