Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. शोपियान जिल्ह्यातील विविध भागात दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.