Supreme Court : सध्या पॉर्न व्हिडिओवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार; म्हटले- नेपाळमध्ये बंदीनंतर काय झाले ते पाहा; 4 आठवड्यानंतर विचार
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अश्लील व्हिडिओंवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने सप्टेंबरमध्ये नेपाळमध्ये झालेल्या जेन-झी निदर्शनांचा उल्लेख करत म्हटले की, “नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर काय झाले ते पाहा.”