Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन
पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे, त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांना नुकतेच रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसांच्या गुंतागुंतीच्या संसर्गाने ग्रासले होते. यापूर्वी, २०२१ मध्ये, त्यांना रोममधील त्याच जेमेली रुग्णालयात १० दिवसांसाठी दाखल करण्यात आले होते.