CBI Charge : सीबीआयने 4 चिनी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले; 100 हून अधिक बनावट कंपन्या तयार केल्या
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीत सामील असलेल्या चार चिनी नागरिक आणि ५८ कंपन्यांसह १७ जणांविरुद्ध चार्जशीट (आरोपपत्र) दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, या आरोपींनी शंभरहून अधिक बनावट कंपन्या तयार केल्या आणि एक हजार कोटींहून अधिक रुपयांची सायबर फसवणूक केली.