Tirupati Temple : तिरुपती मंदिरात लाडूनंतर दुपट्ट्यात घोटाळा; सिल्क असल्याचे सांगून ₹350चे पॉलिस्टरचे दुपट्टे ₹1300ला विकले
आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडूंच्या नंतर प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या दुपट्ट्यांच्या (अंगवस्त्रम) विक्रीत घोटाळा उघडकीस आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका कंत्राटदाराने शुद्ध मलबेरी सिल्कच्या दुपट्ट्यांऐवजी सलग 100% पॉलिस्टरचे दुपट्टे पुरवले.