Prithviraj Chavan : सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी 15 दिवस मिळतील, निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने पृथ्वीराज चव्हाणांना संशय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील. हा कालावधी सरकारला त्यामध्ये काही ‘घालमेल’ किंवा फेरफार करण्यासाठी पुरेसा आहे,” अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.