Fadnavis : फडणवीस म्हणाले- पालिकेच्या निवडणुका नसत्या तर इतका विरोध झाला नसता; उद्धव ठाकरेंच्या विरोधामागे राजकारणच!
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.