Chhagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, भुजबळांचा पुनरुच्चार
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा पुनरुच्चार केला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा समाज EWS मधून आरक्षण घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजातील अभ्यासक व नेते या मुद्यावर बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना हाणला.