Ramdas Athawale : राज ठाकरेंकडे भाषणे देण्याची कला, पण त्याने नेतृत्व होत नाही, रामदास आठवले यांचा निशाणा
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.