Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. त्यातच, मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे नाराजीनाट्य उघडपणे पाहायला मिळाले आणि अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आरक्षण लढ्यासंदर्भातील स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.