• Download App
    Political Rivalry | The Focus India

    Political Rivalry

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला- मुंबईची तिजोरी लुटणारे ‘रहमान डकैत’, आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर

    आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’ आहेत, तर अशा डकैतांना पाणी पाजणारे आम्ही ‘धुरंधर’ आहोत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

    Read more

    Yogesh Kadam,:गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले- माझी इमेज डॅमेज करण्याचे प्रयत्न, माझ्या बदनामीसाठी खासगी आयुष्यात ढवळाढवळ

    पुण्यातील कुख्यात गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले आहेत. गुंड नीलेश घायवळच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम सध्या चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी नकारघंटा वाजवल्यानंतरही कदम यांनी ही फाईल पुढे रेटली. त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांनी विशेषतः ठाकरे गटाने टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणी त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. आता योगेश कदम यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.

    Read more